
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने गुणवंत शिक्षकांसाठी मानाचा समजला जाणारा ज्ञान साधना व विज्ञान भास्कर पुरस्कार राणी पार्वती देवी हायस्कूलचे गणित विषयाचे शिक्षक दशरथ शृंगारे यांना प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल संस्थेच्यावतीने राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी, शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, शिक्षक वृंद यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
ओटवणे सारख्या ग्रामीण भागातील रवळनाथ विद्यामंदिरचा गुणवंत विधार्थी ते आर. पी. डी. हायस्कूल मध्ये एक हुशार विधार्थीप्रिय आदर्श शिक्षक अशी अल्पा वधित ओळख निर्माण करणाऱ्या शृंगारे यांचे ओटवणे गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती ओटवणे दशक्रोशीत आहे. तसेच महाराष्ट्रीय यादव चॅरेटी ट्रस्ट शाखा सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. हे सर्व करत असताना विद्यादानाच पवित्र काम ही ते प्रामाणिक पणे करीत आहेत.राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यू. कॉलेज सावंतवाडी माध्यमिक विभागात गणित हा विद्यार्थ्यांसाठी कठीण समजला जाणारा विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी लावण्या बरोबर शाळेच्या निकालाच्या परंपरेत महत्वाचा वाटा उचलत आहे. त्यांनी केलेले अध्ययनाचे आणि विधार्थी घडविण्याचे काम पाहता त्यांचा या सन्मानासाठी विचार करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर विविध स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










