
सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल 98.27% इतका लागला. प्रशालेत विज्ञान शाखेतून प्रथम मधुकर तेंडोलकर (92.83), द्वितीय काशीराम पालव(91.33) तृतीय तन्मय राणे(90.83) कॉमर्स विभागातून प्रथम तनुज परब(94.83) द्वितीय तझिन खान (94.67) तृतीय अब्दुल्ला शेख(92.83) तर कला शाखेतून प्रथम ऋचा पिळणकर(83.67) द्वितीय तेजल परब(82.83) तर तृतीय वैभवी गावडे (79.50) यांनी प्राप्त केला.
सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच प्र. मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक श्री. एस. एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, तसेच पालक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.