RPD त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Edited by:
Published on: June 06, 2023 19:59 PM
views 214  views

सावंतवाडी : स्पर्धा परीक्षांविषयी जनजागृती समाजातील सर्व घटकांच्याद्वारे होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संस्थाध्यक्ष  विकास सावंत यांनी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी आयोजित इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्या प्रसंगी बोलताना केली. त्याचबरोबर दहावीनंतर  विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेची निवड करावी यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालक, तज्ञ मार्गदर्शक यांच्या चर्चेतून शिक्षणाची दिशा ठरवावी तरच बोर्ड परीक्षेत जसे कोकणातील विद्यार्थी चमकदार कामगिरी करताना दिसतात, तसेच स्पर्धा परीक्षेत देखील यशस्वी होताना दिसतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या उपप्राचार्या प्रा.डाॅ. सुमेधा नाईक यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सावंत हे होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व माझी मुख्याध्यापक व्ही. बी.नाईक, शालेय समिती अध्यक्ष प्रा.डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी.एल. नाईक व संस्था सदस्य श्री अमोल सावंत, श्री चं. मु. सावंत,श्री संदीप राणे ,प्रा. सतीश बागवे,माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत, माजी प्राचार्य कृष्णा परब, माजी उपप्राचार्य प्रा.नारायण देवकर आणि प्रा.बाळासाहेब नंद्दीहळी हे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते माध्यमिक विभागातून एस.एस.सी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनुक्रमे कु.पारस प्रसाद दळवी 96.80% वैष्णवी पुणाजी धुमक 96.60% लता महेश परब 96.40.% आणि उच्च माध्यमिक विभागातून  एच्.एस.सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शाखानिहाय कला शाखेतून कुमारी मुनिरा मुजफ्फर मिर्झा 90. 33% कुमारी देवयानी शिवप्रसाद कोरगांवकर 89. 33% कु.विरेश विपिनचंद्र सातार्डेकर 86. 67% वाणिज्य शाखेतून अनुक्रमे कुमारी केतकी प्रसाद नाईक 89.83%,

कुमारी जान्हवी अभय सावंत 89.67% कुमारी निशिता सुधीर बावकर 89.33%, आणि विज्ञान शाखेतून अनुक्रमे  कु. एल्टन पीटर फर्नांडिस 89.67%,

कुमारी समीक्षा साईनाथ 

पावसकर 84%, कु.संजीव रामचंद्र मसुरकर 83.5% , त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विभागातून 

अनुक्रमे कु.विठ्ठल दीपक गावडे 69. 33%, कु.कुणाल दशरथ पेडणेकर 67. 17%,  व मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटमधून अनुक्रमे अतंरा अमर जाधव 65.00%, दिव्या दत्ताराम गावडे 64.00% या गुणवंतांचा पालकांच्या सोबत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड  प्रतिकूल परिस्थितीत ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी भरपूर कष्ट घेतले. या कष्टाला विद्यार्थी व पालकांनी देखील सोबत केले.  प्रशालेच्या परंपरेला साजेसं यश संपादित केले असे आपल्या मनोगतात सांगून प्राध्यापक, शिक्षक,विद्यार्थी- पालक यांचे कौतुक करून अभिमान व्यक्त केला. तर विद्यार्थ्यांच्या मधून मनोगत व्यक्त करताना सर्व शाखांमधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. मुनिरा मुजफ्फर मिर्झा यांनी आपल्याला मिळालेले यशाचे श्रेय प्राध्यापक, शिक्षक पालक आणि प्रशालेतील अनेक भौतिक सुखानीयुक्त आनंदमय वास्तूला दिले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व माध्यमिक विभागाकडील पर्यवेक्षक प्रल्हाद सावंत सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक ए.व्ही. साळगांवकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले.