
सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण १२६ पैकी १२६ उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतून प्रथम सिद्धी बबन राऊळ ९१.५ टक्के तर द्वितीय कृणाल प्रशांत हरमलकर ९१.६० टक्के तर तृतीय पवित्र हेमंत मसुरकर ९१.४० टक्के व वेदा विश्वेश्वर कोळंबेकर ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत. या शाळेत एकूण ११ विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सी. एल नाईक, दिनेश नागवेकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड आदींनी केले आहे.