तालुकास्तरीय - जिल्हास्तरीय स्पर्धेत RPDचे वर्चस्व !

Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 17:09 PM
views 145  views

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 स्पर्धांमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडीने सालाबादप्रमाणे यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. यात  बांदा येथील शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत  19 वर्षा खालील मुलांमध्ये  राजेश विर्नोडकर तृतीय  ,तेजस दळवी चतुर्थ तर 19 वर्षा खालील मुलींमध्ये अश्विनी भोगण प्रथम 17 वर्षा खालील मुलांमध्ये  वेदांत देसाई पाचवा , 17 वर्षा खालील मुलींमध्ये वैष्णवी धुमक  चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे.  

 आंबोली  येथील शालेय तालुकास्तरीय ज्युडो स्पर्धेत 19 वर्षा खालील मुलांमध्ये जनक नाईक प्रथम, 17 वर्षा खालील मुलांमध्ये प्रथमेश तळवणेकर प्रथम क्रमांक पटकाविला  आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत 17 वर्षा खालील मुलांमध्ये देवांग मल्हार द्वितीय क्रमांक , 17 वर्षा खालील मुलींमध्ये भावना लाखे तृतीय क्रमांक , मानसी रावल चतुर्थ क्रमांक तर 19 वर्षा खालील मुलांमध्ये विराज निवेलकर तृतीय क्रमांक ,  प्रणित गोसावी चतुर्थ क्रमांक ,सोहम पाटील पाचवा क्रमांक 19 वर्षा खालील मुलींमध्ये क्षितिजा मुंबरकर प्रथम क्रमांक पटकाविला आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. 

तालुकास्तरीय खो खो स्पर्धा 19 वर्षा खालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक  , 19 वर्षा खालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक  जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड तर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींमध्ये विजयी 19 वर्षाखालील मुलींमध्ये/मुलांमध्ये गटात दोन्ही संघ विजयी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 19 वर्षाखालील मुलींमध्ये विजेता, 17 वर्षाखालील मुलींमध्ये उपविजयी, 17 वर्षाखालील मुलांमध्ये विजयी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा

गोळाफेकमध्ये 17 वर्षाखालील मुलांमध्ये गौरव गावडे मध्ये प्रथम क्रमांक, 200 मिटर धावणे 17 वर्षाखालील मुलींमध्ये सारा शेख प्रथम क्रमांक, 19 वर्षा खालील मुलांमध्ये धावणे 5000 मिटर धावणे निलेश सावंत  द्वितीय  ,3000 मिटर धावणे रामचंद्र कोळेकर प्रथम, 800 मिटर धावणे भिकाजी राऊळ प्रथम , अनुराग वराडकर द्वितीय , 400 मिटर धावणे यश नाईक प्रथम ,200 मिटर धावणे सुनील जंगले द्वितीय ,100 मिटर धावणे हर्ष जाधव प्रथम,  राजेंद्र मांजरेकर द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.19 वर्षाखालील मुलींमध्ये धावणे 800 मिटर धावणे अर्पिता राऊळ प्रथम  तर 400 मिटर धावणे  सुहानी सावंत  द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

 जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत 17 वर्षा खालील मुलांमध्ये फिलिप्स फर्नांडिस प्रथम क्रमांक, 19 वर्षा खालील मुलांमध्ये शमित लाखे प्रथम क्रमांक, 19 वर्षा खालील मुलींमध्ये वैष्णवी भांगले प्रथम क्रमांक पटकाविला आहे आणि विभागस्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय बॅडमिंटन  स्पर्धा 19 वर्षा खालील मुलींच्या  संघाने उपविजेते पद पटकाविले  आहे.  जिल्हास्तरीय 19 वर्षा खालील बुद्धीबळ स्पर्धेत राजेश विर्नोडकर याने  4 था क्रमांक पटकाविला व  विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत स्पर्धा 19 वर्षा खालील मुलांच्या संघाने विजेते पद पटकाविले  आहे व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत 17 वर्षा खालील मुलांमध्ये देवांग मल्हार याने चतुर्थ क्रमांक 19 वर्षा खालील मुलींमध्ये क्षितिजा मुंबरकर चतुर्थ क्रमांक पटकाविला व  विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गोळाफेकमध्ये  सुहानी गावडे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत 19 वर्षा खालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक तसेच 19 वर्षा खालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. जिल्हास्तरीय शालेय शुटींग बॉल स्पर्धेत 17 वर्षा खालील गटात द्वितीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवृंद, क्रीडाशिक्षक श्री. सागर सावंत व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव प्रा. व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड ,  उपमुख्याध्यापक ए. व्ही. साळगांवकर , पर्यवेक्षक पी.एम.सावंत व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.