१७ डिसेंबरला दोडामार्गात माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण

Edited by: संदीप देसाई
Published on: December 14, 2023 19:38 PM
views 266  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात प्रथमच माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण रविवारी १७ डिसेंबरला होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दादा साई यांनी केले आहे. 

वारकरी सांप्रदायामध्ये जगद्गुरु श्री तुकोबा रायांचे ११ व्या पिढीतील विध्यावंश गुरुवर्य ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर यांच्या कृपा आशिर्वादाने व मठाधिपती श्रीमान दादा साई यांच्या प्रेरणेने श्री दादा साई मंदिर मठ दोडामार्ग येथे दिनांक १४ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत भव्य मंचरी गाथा भजन, प्रवचन, किर्तनाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी आपल्या सुख-समृध्दीसाठी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती दादा साई यांनी केले आहे.

  १७ डिसेंबर ला सकाळी ८ ते ९ मंचरी ग्रंथाची सांगता पूजन व नंतर ९ ते ११ वा. काल्याचे किर्तन होईल. दुपारी ११ ते १ या वेळेत भव्य दिव्य दिंडीसोहळा आणि अश्वाचे गोल रिंगण. श्री गुरु राणोजी मालक / ह.भ.प. शितोळे सरकार व दादासाई महाराज यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येईल. या सोहळयास समस्त सिंधुदुर्ग व गोवा वारकरी मंडळ व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मठाधिपती श्री. दादा साई यांनी केले आहे.