
कणकवली : कणकवली शहरात रोटरी क्लबच्या माध्यमातून आनंद मेळाचे आयोजन करण्यात आले आहे. पण या कार्यक्रमाचा त्रास कणकवलीतील स्थानिक नाथ पे नगर व जळकेवाडी रहिवाशी यांना होत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की १० मार्च ते २२ मार्च २०२३ या दरम्यान उपजिल्हा रुग्णालया समोरील पटांगणावर रोटरी आनंद मेळा होत आहे. या कालावधीत १० वी व १२ वी ची बोर्ड परिक्षा चालू आहे. मेळाव्यांत होणारे कार्यक्रम व स्पर्धा, तसेच लावण्यात आलेल्या पाळण्यांचा मोठा आवाज, जनरेटर, स्पीकर चा कर्णकर्कश आवाज यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. आमचा कार्यक्रमास विरोध नसून हा कार्यक्रम परिक्षा कालावधीत होत असल्याने सदर कार्यक्रम पुढे ढकलावा, तरी सदर कार्यक्रम परिक्षा पूर्ण झाल्यावर (दि. २५ मार्च नंतर) घेण्यात यावा. असे सांगितले आहे
तसेच मुलांचे १० वी व १२ वी चे वर्ष महत्वाचे असून त्यांचे नुकसान झाल्यास ती जबाबदारी सर्वस्वी तुमची राहिल असं देखील या पत्रात त्यांनी सांगितले आहे