रोटरी डिस्ट्रीक स्पोर्टस यावर्षी वेंगुर्ल्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिलाच मान
Edited by: दिपेश परब
Published on: November 28, 2023 14:42 PM
views 55  views

वेंगुर्ला : रोटरी डिस्टिक्ट ३१७० चे डिस्टिक्ट स्पोर्टस् इव्हेंट्स यावर्षी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत वेंगुर्ल्यात आयोजित केले आहेत. या स्पर्धा दि. २ व ३ डिसेंबर रोजी येथील कॅम्प मैदानावर (गावस्कर स्टेडीयम) पार पडणार आहेत अशी माहिती रोटरी क्लब वेंगुर्लाचे अध्यक्ष शंकर उर्फ राजू वजराटकर यांनी सोमवारी (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत दिली.

वेंगुर्ले येथील रोटरी क्लबच्या कार्यालयात रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परीषदेच्या सुरूवातीला स्पर्धेच्या चषकांचे अनावरण क्लबचे मेंबर तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लब अध्यक्ष राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, टेजरर पंकज शिरसाट, इव्हेंट चेअरमन राजेश घाटवळ, इव्हेंट सेक्रेटरी ऍड प्रथमेश नाईक, इव्हेंट चेअरमन मुकुल सातार्डेकर, स्पोर्टस हेड दिलीप गिरप, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, सचिन वालावलकर, गणेश अंधारी, दिपक ठाकूर, मृणाल परब, नागेश गावडे, डॉ राजेश्वर उबाळे आदि रोटरियन उपस्थित होते.

रोटरी डिस्टिक्ट ३१७० मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पूर्ण गोवा राज्य, तसेच कर्नाटक राज्यातील बेळगांव, हुबळी, धारवाड आदि भागांचा समावेश होत असून झोनल स्पोर्टस मधील विजेत्या आणि उपविजेत्या संघ डिस्ट्रिक्ट स्पोर्टसमध्ये खेळू शकतात. क्रीडा प्रकारात क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुध्दिबळ, अँथलेटिक्स मध्ये १०० मीटर रनिंग, १०० बाय ४ मीटर रिले आणि गोळाफेक आदी खेळांचा समावोश आहे.

या रोटरी क्लबच्या स्पोर्ट इव्हेंटचे उदघाटन गव्हर्नर नासीरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, दोन वर्षानंतरचे भावी प्रांतपाल लेनी डिकोस्टा, शरद पै. विक्रांतसिंग कदम, वासुकी सानजी, अजय सेनन, प्रसन्न देशींगकर, संजय साळुंखे, क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे यासह रोटरीतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.