सावंतवाडी : बांदा रोटरी क्लबतर्फे डॉ. तायशेटे यांच्या सहकार्यातून मिळालेली व्हीलचेअर येथील मंगेश मेस्त्री यांना रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष सुधीर शिरसाट, सचिव शिवानंद भिडे, खजिनदार स्वप्नील धामापूरकर, आपा चिंदरकर आदी उपस्थित होते. मेस्त्री यांनी आपल्याला व्हीलचेअर मिळावी अशी मागणी रोटरी क्लबकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन त्यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आल्याचे अध्यक्ष श्री. गावडे यांनी सांगितले.