रोटरी क्लब वेंगुर्लाकडून गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ गुरुजनांचा सन्मान...!

Edited by: दिपेश परब
Published on: July 04, 2023 14:08 PM
views 161  views

वेंगुर्ला : गुरुपौर्णिमेनिमित्त तालुक्यातील दोन ज्येष्ठ गुरुजांनांचा सन्मान सोमवारी ३ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन  तर्फे करण्यात आला.यात राष्ट्रपती पुरस्कार विजेते सत्यवान पेडणेकर गुरुजी आणि रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या माजी शिक्षिका सुमन परब उर्फ खोत मॅडम यांचा त्यांच्या घरी जाऊन रोटरी वेंगुर्ला चे नूतन अध्यक्ष राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, ट्रेजरियन पंकज शिरसाट, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सुरेंद्र चव्हाण, वसंतराव पाटोळे, आनंद बोवलेकर, प्रथमेश नाईक, मुकुल सातार्डेकर आदि रोटरियन उपस्थित होते.