रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाने राबविले रा प.महामंडळासाठी महाआरोग्य शिबिर

Edited by: दिपेश परब
Published on: January 20, 2024 12:31 PM
views 75  views

वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मार्फत शनिवार २० जानेवारी रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहक यांच्यासाठी महाआरोग्य शिबीर राबविण्यात आले.

    राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक हे दिवसरात्र आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. कोकणातील रस्त्यांचा विचार करता त्यांचे हे काम किती अवघड आणि जोखमीचे आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चांगली असणे आवश्यक आहे. त्यांना उद्भवणाऱ्या आजारांचे वेळेत निदान होऊन त्यावर योग्य उपचार होणे हा या शिबिराच्या मुख्य उद्देश होता.

   रोटरी चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो नासिरभाई बोरसादवाला यांच्या संकल्पनेतून हे शिबीर राबविण्यात आलेले होते. रो डॉ राजेश्वर उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये आयोजित या शिबिराचे उद्घाटन वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष तथा रोटरीयन दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक अत्यंत प्रामाणिक आणि जोखमीचे काम करीत असल्याबद्दल रोटरी वेंगुर्ला मार्फत त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाचे अध्यक्ष रो. राजू वजराटकर, वेंगुर्ला आगार चे व्यवस्थापक राहुल कुंभार, रोटरी चे असिस्टंट गव्हर्नर रो. संजय पुनाळेकर, डॉ राजेश्वर उबाळे, रो. ऍड प्रथमेश नाईक, पंकज शिरसाट, दादा साळगावकर, मुकुल सातार्डेकर, सुरेंद्र चव्हाण, दिलीप शितोळे, वसंतराव पाटोळे, सुनिल रेडकर, अनमोल गिरप, मृणाल परब, आनंद बोवलेकर आदी रोटरीयन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. डॉ आनंद बांदेकर यांनी केले तर आभार डॉ  राजेश्वर उबाळे यांनी मानले.