रोटरी बांदाचा शानदार पदग्रहण सोहळा !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 14, 2024 06:32 AM
views 127  views

 सावंतवाडी : रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा तिसरा पदग्रहण सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी रो. सिताराम गावडे यांनी अध्यक्ष, रो. शिवानंद भिडे यांनी सचिव पदाची तर स्वप्निल धामापुरकर यांनी खजिनदार पदाची सूत्रे हाती घेतली.  रोटरी कडून भविष्यात अशाच प्रकारे सामजिक सांस्कृतिक, शैक्षणिक ,आरोग्य या समाजाभिमुख कार्यात काम करावे आणि रोटरी क्लबचा आलेख चढता ठेवावा असे प्रतिपादन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांनी केले .

     

रोटरी क्लब ऑफ बांदाच्या सन २०२४-२ ५ च्या कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा बुधवारी श्री स्वामी समर्थ हॉलमध्ये  पार पडला‌. या समारंभात प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणून आनंद कुलकर्णी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो राजेश घाटवळ , डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो प्रणय तेली , असिस्टंट गव्हर्नर रो महादेव पाटकर , असिस्टंट गव्हर्नर रो डॉक्टर विद्याधर तायशेटे  आदी उपस्थित होते. कार्यक्रमात लांबर कुटुंबीय यांना शेती मधून व्यवसाय निर्मती करून यशस्वी व्यावसायिक म्हणून पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर श्रीकृष्ण शिरसाट यांनी कठीण काळात हलाकीचे दिवस काडून त्यावर मात करत उद्योग धंद्यात आपले व कुटुंबाचे नाव केले यासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर गुणवंत विद्यार्थी  यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गरजू विद्यार्थी यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीताराम गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष  म्हणून  निश्चितच भरीव असे कार्य करण्याचे आपला उद्देश आहे. त्यामध्ये मला अनेक मान्यवरांचा आशीर्वाद मिळेल तसेच तुमचा सर्वांच्या सहकार्याने आपण आपल्या क्लब ची समाजसेवेची चालत आलेली यशस्वी परंपरा यापुढे चालू ठेवू असे प्रतिपादन केले. यावेळी माजी अध्यक्ष  प्रमोद कामत यांचा माजी डिस्टिक गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. राजेश घाटवळ,  प्रणय तेली,  महादेव पाटकर, डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी  आपली मनोगत व्यक्त केली.  

     

यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष भाजपा व  जी प सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक , ग्रामंचायत सदस्य श्रेया केसरकर, बँक ऑफ इंडिया बांदा व्यवस्थापक पवन कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष मंदार कल्याणकर,  सुदन केसरकर,  सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, दिलीप कोरगावकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, फिरोज  खान, बाबा काणेकर, घनश्याम पावसकर, संतोष सावंत, डॉ. नारायण नाईक,  विराज परब, दिगंबर गायतोंडे, स्वागत नाटेकर, सचिन मुळीक, तुषार धामापुरकर, रत्नाकर आगलावे, स्वप्नील धामापूरकर, प्रवीण शिरसाट, सुनील राऊळ, वसंत राऊळ, दिलीप घोगळे, प्रसाद सातार्डेकर ,आनंद दिवस 

अनंत नाडकर्णी ,डॉ. प्रसाद कोकाटे,योगेश परुळेकर, हनुमंत  शिरोडकर,   अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर , मिताली सावंत, ईश्वरी  कल्याणकर आणि   जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी रोटरीयन उपस्थित होते. रोटरी क्लब बांदा या परिवारात  रवी गवस यांना नवीन सदस्य म्हणून सामील करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन   स्वागत नाटेकर व संतोष सावंत यांनी केले.