टेनिस क्रिकेट विश्वाला धक्का ; रोहित बोवलेकर यांचे निधन

Edited by: दिपेश परब
Published on: July 25, 2023 18:17 PM
views 9840  views

वेंगुर्ला : तालुक्यातील मठ येथील रहिवासी रोहित स्पोर्ट्स या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट संघाचे मालक तसेच बोवलेकर कॅशुचे संचालक रोहित बोवलेकर यांचे आज २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्याने गोवा व्हिजन येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर उद्या २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मठ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रोहित यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.

रोहित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. बोवलेकर कॅशुचे मालक सुरेश बोवलेकर यांचे ते पुत्र होत. रोहित बोवलेकर यांना क्रिकेट ची प्रचंड आवड होती. त्यांच्या मालकीचा रोहित स्पोर्ट संघाने लाखोंची बक्षिसे असणाऱ्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट मध्ये रोहित स्पोर्ट्स हा संघ अग्रस्थानी आहे. त्यांच्या या जाण्याने टेनिस क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना धक्का बसला असून टेनिस क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.