
देवगड : रोहित स्पोर्ट बांदेश्वर बांदा संघ ठरला आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा यावर्षीचा मानकरी ठरला असून उपविजेते पद कोयंडे इलेव्हन कालवी या संघाने पटकावले देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथील भव्य ओव्हरआर्म डे नाईट क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कोयंडे इलेव्हन कालविणे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट यांनी उभे केलेले 66 धावांचा पाठलाग करत असताना कोयंडे इलेव्हन कालवी 52 धावा करत 14 धावांनी पराभूत झाली.
यावेळी उद्योजक सतीश आचरेकर, नगरसेवक बुवा तारी, तेजस मामघाडी,श्यामा सारंग,कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, उद्योजक कांता कोयंडे,सहदेव बापर्डेकर, कोलंबकर हॉटेलचे मालक बाळा कोलंबकर,दिग्विजय कोलंबकर तसेच आनंदवाडी अध्यक्ष प्रदीप कोयंडे,गावचे पाटील सुनील धुरी,क्रिकेट अध्यक्ष गुरुनाथ तारी, उत्तम मुणगेकर,किशोर कुबल, शिवाजी प्रभू,राहुल मुंडेकर,विकास कोयंडे आधी आनंदवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स विजेत्या संघाला ३,३३,३३३ रोख व चषक देऊन गौरविण्यात आले तर कोयंडे इलेव्हन कालवी या उपविजेता संघास १,५५,५५५ रोख रक्कम व चषक गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज पप्पू तोडकर,उत्कृष्ट गोलंदाज गौरेश नागवेकर, उत्कृष्ट फलंदाज केतन म्हात्रे यांना गौरविण्यात आले.
तसेच या स्पर्धेदरम्यान विविध राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली स्पर्धेत आयपीएल स्पर्धेतील समालोचक कुणाल दाते (मुंबई), चंदू शेटे (मुंबई), अशोक नाईक (सिंधुदुर्ग), रेश्मा मयेकर यांनी स्पर्धेचे समालोचन केले होते
सिंधुदुर्गातील नावाजलेली व देवगड तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी डे नाईट आनंदवाडी क्रिकेट स्पर्धेची ओळख असून ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक गर्दी करतात.