
रोहा : सबंध रायगड जिह्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास शुक्रवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली.यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने रोहा पोलिस निरीक्षक मारुती पाटील व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झालेली,यावेळी मंत्री,खासदार,राजकिय पक्षांचे प्रमुख आणि शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हा सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. दोन वर्षांपूर्वी मंदिरा समोरील सभामंडप हटविण्यात आले आहे,त्या ठिकाणी दोन्ही बाजूला बैठक गॅलरी करण्यात आल्याने भक्तांची गेली अनेक वर्षांची गैरसोय दूर झाली.भक्तांना गॅलरीत बसून मानवंदना पाहता आली.यावेळी मंदिरात मंत्री अदिती तटकरे,खा.सुनिल तटकरे,धैर्यशील पाटील,माजी आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड.प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम,प्रांत खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख,राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजय मोरे,माजी नगराध्यक्ष समीर शेडगे,संतोष पोटफोडे,भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग,विश्वस्त नितिन परब,समिर सकपाळ,लालताप्रसाद कुशवाह, आनंद कुलकर्णी,महेश सरदार,मयुर दिवेकर, संदीप सरफळे, महेश कोलटकर, चंद्रकांत पार्टे, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, राजेंद्र पोकळे, अमित उकडे, राजेश काफरे, रविंद्र चाळके, निलेश शिर्के, प्रशांत देशमुख आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्सवानिमित्त मंदिराचा संपुण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आलेला,पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झालेले.भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली.याठिकाणी विविध वेशभूषा करून तरुणवर्ग उत्साहाने सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्तांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदीरात परतणार आहे.यावेळी पून्हा महाराजांना पोलिस मनवंदना देण्यात येते.
पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठीकठीकाणी फुलांनी आणी सढारांगोळयांनी बहरलेले रस्ते आणी विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली रोषनाई या सोहळयाला एक वेगळे रूप प्राप्त करून देते, रोहयात पालखीच्या दर्शना सााठी येणाऱ्या भाविकांसाठी जैन संघटना,रोटरी क्लब,प्रकाश जैन आदी विविध सामाजिक मंडळांमार्फत शहरात ठिकठिकाणी थंडपेये, चहा आणि अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आलेली.तर धावीर देवाचे असंख्य सेवेकरी मंडळी याठिकाणी पालखीचे जागोजागी व्यवस्थित औक्षण करून ग्रामप्रदक्षिणा करता येईल यासाठी जातीने लक्ष देताना दिसत आहेत.याच सेवेकरी मंडळीच्या वतीने चहा,नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तमरित्या केली असल्याचेही पहावयास मिळत आहे.येथिल अशिर्वाद मंडळातर्फे भाविकांसाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेली मोफत भोजन व्यवस्था यावेळी करण्यात आलेली आहे.