श्रमदानाने रस्ता रुंदीकरण...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 04, 2024 10:52 AM
views 83  views

देवगड : देवगड चाफेड गांव हा अतिशय दुर्गम भागात असून. येथील गावठण भागातील शाळेपर्यंत गेली कित्येक वर्षे पक्का रस्ता नाही त्यामुळे खूपच गैरसोय होत होती. ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने हा रस्ता श्रमदानाने तयार केला.चाफेड गाव हा देवगड तालुक्याच्या एका टोकाला वसलेला आहे.या गावाची भौतिक रचना डोंगराळ भागात आहे.या गावात गावठण भागात शाळा असून या शाळेपर्यंत केवळ साधी पायवाट होती. त्यामुळे मुलांना शाळेत जाताना खूपच अडचणीचे होत होते. गावाचे निवडणूक केंद्र देखील याच शाळेत आहे.

प्रत्यक्ष निवडणूक काळात रस्ता नसल्यामुळे मुख्य रस्त्यापासून या शाळेपर्यंत चारचाकी कुठलेही वाहन जात नव्होते. तसेच शाळेत शालेय पोषण आहाराचे साहित्य आणताना देखील खूपच कठीण जात होते. खूपच गैरसोय होत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने हा रस्ता लोकवर्गणी काढून तयार केला. भविष्यात या रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरण व्हावे अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे. याबाबत सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे यांनी आपण नक्कीच याबाबत लवकरात लवकर प्रयत्नशील राहून हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

गेले दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी ग्रामस्थांनी अथक मेहनत घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण केले. तसेच रस्त्यालगत लागणाऱ्या जमिनी देखील संबधित जमीन मालकांनी विनामूल्य देऊन सहकार्य केले. या श्रमदानाच्या वेळी सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे, माजी सरपंच आकाश राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर, माजी सरपंच संतोष साळसकर, शिवसेना शाखाप्रमुख उदय राणे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष प्रवीण राणे, अशोक घाडी, प्रदीप घाडी, दर्शना घाडी, प्रकाश मोंडकर, दिक्षिता घाडीगावकर, अनंत घाडीगावकर आदींसह ग्रामस्थ, महिलावर्ग यावेळी उपस्थित होते.