कसाल रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी मंजूर !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 20, 2024 06:07 AM
views 130  views

कुडाळ : गेली अनेक वर्षे खड्डेमय अवस्थेत असलेला कसाल हेदुळ खोटले वायंगवडे गोळवन मार्ग ईजिमा ४० हा रस्ता दुरुस्ती करीता निधी उपल्बध करून घ्यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. भाजपा नेते निलेश राणे हेदुळ माऊली मंदिर येथे जत्रोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असताना भाजपा बूथ अध्यक्ष रमेश पुजारे, बाबू पूजारे, हेदुळ सरपंच प्रतीक्षा पांचाळ यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकरीता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

त्या नुसार निलेश राणे यांनी हेदुळ गावसहितच हेदुळ व वायंगवडे गावांना जोडणाऱ्या या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे याची शिफारस केली होती.

त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्यात जिल्हा वार्षिक योजना तर उर्वरित रस्त्यासाठी राज्य अर्थसंकल्प अंतर्गत निधी मिळणार असून हा रस्ता आता खड्डेमुक्त होणार आहे.