
दोडामार्ग : हेवाळे ते मुळस मार्गावर बुधवारी दुपारी एक प्राचीन, शेकडो वर्षांपूर्वीचे वृक्ष अचानक रस्त्यावर कोसळले. परिणामी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुख्य रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांची वाताहत झाली.
हेवाळे ते मुळस य रस्त्यालगत शेकडो वर्षांपूर्वीचा एक जुनाट वृक्ष होते. तालुक्यात बुधवारी सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. स्थानिकांच्या माहितीनुसार झाडाच्या मुळाजवळील जमीन गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे भुसभुशीत झाली होती. त्यातच सकाळच्या वाऱ्याचा जोर यामुळे हे भले मोठे झाड सरळ रस्त्यावर कोसळले. सुदैवाने झाड कोसळताना रस्त्यावरून कोणतीही वाहने जात नव्हती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. मात्र, झाडामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून कामावर जाणारे ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
स्थानिकांनी जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. झाड पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला सुद्धा देण्यात आली. झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. “झाड अतिशय मोठे असल्याने त्याच्या फांद्या तोडून वेगवेगळ्या भागांमध्ये कापून हटवावे लागले.