माडखोल डुंगेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 20 लाखांचा निधी !

राजेंद्र पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: February 22, 2024 13:49 PM
views 173  views

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल डुंगेवाडी रस्त्याचे अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माडखोल डुंगेवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी वीस लाख रूपयांचा निधी मंजूर केला. त्याचा शुभारंभ सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रेमानंद देसाई, माजी सरपंच सुर्यकांत राऊळ, ग्रा.पं. सदस्य विजय राऊळ, दिप्ती राऊळ, सरिता राऊळ, प्रज्ञा राणे, जान्हवी पाटील, ग्रामस्थ संतोष राऊळ, राजकुमार राऊळ, संतोष राणे, विशाल राऊळ, दशरथ राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

माडखोल डुंगेवाडी मुख्य रस्त्याचे डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले.