
वैभववाडी : वाभवे दत्तमंदिर ते कोंडवाडी रस्ता नूतनीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे. अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
दत्त मंदिर ते वाभवे कोंडवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला अनेक खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली आहे.यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. सदर काम मंजूर असून त्या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ही मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी स्वप्नील शिर्के, सचिन रावराणे, स्वप्नील रावराणे, योगेश पांचाळ यासह ग्रामस्थ उपस्थित होते.