रेडी कुळकार मंदिरात उद्या धार्मिक विधी सोहळा

Edited by: दिपेश परब
Published on: April 27, 2023 15:57 PM
views 106  views

वेंगुर्ला : 

तालुक्यातील रेडी - गावतळेवाडी येथील श्री देव कुळकार मंदिरात उद्या शुक्रवार दिनांक २८ एप्रिल रोजी श्री देवी माऊलीची पालखी व बारा पंचायतन देवतांची भेट याची आठवण म्हणून धार्मिक विधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता स्थानिकांची भजने व रात्री ८ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.