
कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गांवर पावशी येथे चालत्या गाडीतून पडलेली कपड्यांनी भरलेली बॅग पणदुर येथील रिक्षा चालक महेश पालव यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
रिक्षा चालक महेश पालव यांनी दिलेले बॅग पोलिसांकडून तपासण्यात आली आहे. तर बॅग मालकाशी पोलीस लवकरच संपर्क साधतील असे पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी सांगितले तर रिक्षा चालक महेश पालव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक रोनाल मुल्ला यांनी अभिनंदन केले.