रिक्षा चालकाला चक्कर ; चार दुचाकींना ठोकर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2024 16:09 PM
views 1510  views

सावंतवाडी  : रिक्षा घेऊन बाजाराच्या दिशेने जात असताना चालू रिक्षातच चालकाला अचानक चक्कर आल्याने रिक्षाची रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार दुचाकींना धडक बसली. त्यानंतर लगतच असलेल्या बंद स्टॉलला जाऊन ही रिक्षा धडकली. शहरातील सारस्वत बँकेलगत हा अपघात घडला. या अपघातात सदर रिक्षासह चारही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. तर रिक्षा चालकाला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.