ऋचा महाबळ यांना 'अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार'

Edited by: संदीप देसाई
Published on: October 12, 2023 11:00 AM
views 139  views

दोडामार्ग : अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई यांचे अष्टपैलू साहित्य भूषण गौरव पुरस्कार यंदा कोलझर येथील सौ. ऋचा हनुमंत महाबळ यांना मिळाला आहे. संस्थेचे संस्थापक शिवाजी किसन खैरे यांच्या माध्यमातुन सौ. महाबळ यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला आहे. 

या संस्थेच्या वतीने "अक्षरमंच काव्यसमूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभाग घेऊन सर्वोकृष्ट कविता सादर केल्या बद्दल या साहित्य कलेच्या सन्मानार्थ सौ. महाबळ यांना "अष्टपैलू साहित्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार" सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला आहे.  त्यांच्या ह्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.