संच मान्यतेचे सुधारित निकष ठरवणारा शासन निर्णय रद्द करा

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 19, 2024 13:25 PM
views 273  views

देवगड : संच मान्यता सुधारित निकष ठरवणारा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागचा दि.१५ मार्च २०२४ हा त्वरित रद्द करा असे निवेदन आकाश तांबे अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी ना.दीपक भाई केसरकर मंत्री शालेय शिक्षण व मराठी राजभाषा तसेच रणजितसिंह देओल सचिव शालेय शिक्षण, तसेच तुषार महाजन सचिव शालेय शिक्षण,महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्या कडे देण्यात आले. यावेळी संच मान्यता सुधारित शासन निर्णय शालेय शिक्षण दि.१५ मार्च २०२४ त्वरित रद्द करण्यात बाबत मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच संच मान्यतेचे सुधारित निकष ठरवणारा शासन निर्णय दि.15 मार्च 2024 हा  पुरोगामी महाराष्ट्राला शिक्षणापासून वंचित ठेवणारा, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा, राज्यातील वंचित, कष्टकरी, बहुजनांना शिक्षणा पासून दूर करू पाहणारा आहे . आम्ही या शासनाच्या निर्णयाचा  जाहीर निषेध करत आहोत.

 संच मान्यता सुधारित निकष ठरवणारा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि.15 मार्च 2024 चा शासन निर्णय त्वरित  रद्द करावा, अशी या निवेदनातून विनंती करण्यात आली आहे.