
सावंतवाडी : युवा सेना सिंधुदुर्ग सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व कोकण निरीक्षक राहुल अवघडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली .
या आढावा बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने युवासेना व युवती सेनेची रिक्त असलेली पदे लवकरात लवकर नियुक्ती करणे. नियुक्ती करत असताना युवासेना व युवती सेना यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड .नीता कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम व युवा सेनेच्या पदाधिकारी यांचे नियुक्ती करणे असे ठरविण्यात आले. जे पदाधिकारी सक्रियपणे कार्यरत नसतील त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देणे. युवा सेना कॉलेज कक्षा युनिटची प्रत्येक महाविद्यालय स्थापन करणे. गाव तिथे युवा आणि युवा तिथे युवासेना या उपक्रमातून प्रत्येक गावात तालुक्यामध्ये विभागात जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी युवासेनेचे फलक लावणे. या विषयावर चर्चा करण्यात आली.
आमदार दीपक केसरकर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना युवासेना संघटन गावागावात मजबूत करणे, सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन गाव तिथे युवान युवा तिथे युवा सेने यानुसार काम सुरू आहे. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनीही युवा सेनेला मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाप्रमुख संजू परब आणि जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनीही संघटना वाढीसाठी काय प्रयत्न करायला हवे या गोष्टींच मार्गदर्शन केलं. युवासेनेमार्फत आमदार दिपक केसरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, युवासेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, युवासेना वेंगुर्ला शहर प्रमुख सागर गावडे, युवासेना वेंगुर्ला शहर सचिव उमेश आरोलकर, युवा सेना वेंगुर्ला सोशल मीडिया प्रमुख स्वप्निल होसमणी, युवासेना सावंतवाडी शहर प्रमुख निखिल सावंत, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, अशोक दळवी, आबा केसरकर यांच्यासाहित युवासैनिक उपस्थित होते.