
मंडणगड : 1 ते 7 ऑगस्ट 2025 या राज्यात विशेष महसुल सप्ताहाचे निमीत्ताने महसुल विभागाचेवतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडणगड तहसिल कार्यालयाचेवतीनेही या पुर्ण सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेली असल्याची माहीती तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी दिली आहे. यात 1 ऑगस्ट रोजी महसुल दिनाचे निमीत्ताने महसुल सप्ताह शुभांरभ होणार आहे. या दिवशी महसुल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते विविध दाखल्यांचे तहसिल कार्यालय मंडणगड येथे वितरण होणार आहे.
2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर 2011 चे पुर्वीपासून रहिवासाचे प्रयोजनाना अतिक्रमण केलेल्या पात्र कुटुंबाना अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असेलल्या कुटुंबाना अतिक्रमीत जागांचे पट्टे वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी रस्त्याचे दुतर्फा वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डी.बी.टी. ने झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.
6 ऑगस्ट रोजी शासकीय जमीनीवर अतिक्रमणे निष्कासीत करणे त्या अतिक्रमण मुक्त करणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे, 7 ऑगस्ट रोजी एम. स्टँड धोरणाची अंमलबजावणी करणे, व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे, धोरण पुर्णत्वास नेणे व महसुल सप्ताह सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरीकांना या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन तहसिल कार्यालायेचवीतने कऱण्यात आले आहे.