
सिंधुदुर्गनगरी : महसूल मंत्री तसेच माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ते जिल्हाधिकारी संकुलाला भेट देणार असून जिल्ह्यातील नागरिकांची महसूल विषयक विविध निवेदने स्वीकारणार आहेत. त्यांनी घेतलेले महसूल विषयक निर्णय, प्रदेश अध्यक्ष असताना केलेलं काम हे अतिशय नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी आहेत. तसेच सिंधुदुर्ग मधील सर्वसामान्य लोकांचे शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 11.00 ते 12.00 जिल्ह्यातील विविध निवेदन स्वीकारणे.12.30 पत्रकार परिषद तर दुपारी 1.00 ते 2.30 जिल्हा महसूल अधिकारी आढावा बैठक संपन्न होणार आहे.
दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार असून ते भाजपा कार्यकर्त्यांशी संघटनात्मक कामासंदर्भात संवाद साधणार आहेत.तसेच नव्याने लागू होत असलेल्या तुकडा बंदी विधेयकातील अपेक्षित सुधारणा संदर्भात नगरपालिका, नगरपंचायती लगतच्या गावातील प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.या सर्व प्रतिनिधींनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे.
तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते या सर्वानी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.