
सावंतवाडी : सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर हे बेपत्ता झाले असून याबाबत कुटुंबियांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. गणपत शिरोडकर हे मळगाव येथील रहिवासी असून ब्रीजच्या बाजूला त्यांचे घर आहे. सकाळी सात वाजता घरातून मॉर्निंग वॉकसाठी ते निघून गेले ते अद्यापही घरी परतले नाही. कुटुंबियानी याबाबत सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये नापताची तक्रार दाखल केली आहे. सावंतवाडी पोलीस कर्मचारी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शोध कार्य करत आहे. तरी श्री. शिरोडकर कुठे आढळून आल्यास पोलीस स्टेशन अथवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांच्याशी वा कुटुंबाशी संपर्क साधावा.
रवी जाधव : 9405264027
रूपा मुद्राळे : 9422633971
नितीश : 932563046
बबलू : 99588482985