
देवगड : देवगड तालुक्यातील गवाणे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि एलआयसीचे ज्येष्ठ एजंट म्हणून परिचीत असलेले व्यक्तिमतत्व जी. एल. तांबे (७७) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
जी. एल. तांबे यांनी गवाणे हायस्कूलमध्ये अनेक वर्षे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी धुरा सांभाळली होती. एलआयसीमध्येही त्यांनी अनेक वर्षे वरिष्ठ विमा प्रतिनिधी म्हणून आपल्या कार्याचा दबदबा निर्माण केला होता. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. त्यांनी मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा पाया रचला. या संघटनेच्या माध्यमातून अनेकांना न्याय-हक्क मिळवून दिला. प्रसंगी स्वखर्चाने संघटनेचेकामकाज केले. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जामसंडे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आकाश तांबे तसेच तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपीक राजेश तांबे आणि टाटा एआय लाईफ इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले विकास तांबे यांचे ते वडील होत.










