निवृत्त प्राथ. शिक्षक सहदेव परब यांचं निधन

Edited by: ब्युरो
Published on: September 06, 2023 17:59 PM
views 79  views

वेंगुर्ला : निवृत्त प्राथमिक शिक्षक, मातोंड देवस्थान मानकरी, मातोंड ग्रामपंचायतचे माजी सदस्य, गावठणवाडीचे वाडेप्रमुख सहदेव पाये परब गुरुजी, 92 वय यांचे आज दुपारी ३.३० वाजता निधन झाले.

देवस्थान मानकरी दीपक परब, सावंतवाडी येथील महालक्ष्मी रेस्टोरंटचे मालक प्रदीप परब  व सुनील परब यांचे ते वडील होत. पत्रकार दीपेश परब यांचे ते आजोबा होत.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, मोठा परिवार आज रात्री ७ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.