
सावंतवाडी : राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा १२ वीचा निकाल आर्ट्स ९९.६२ टक्के, कॉमर्स ९९.६९ टक्के, सायन्स ९९.६२ टक्के तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात १०० पैकी १०० गुण भक्ती गुडगीळ हीन अकाउंटन्सी विषयात प्राप्त केले. तर श्रावणी रासम, सिद्धार्थ आडेलकर, आदिती चव्हाण, तन्मय गवस, सिमरन पास्ते यांनी आयटी विषयात १०० गुण मिळवत विक्रम रचला आहे.
यात प्रशालेत कला विभागात खुशी रेडकर ८७.५० टक्के प्रथम, द्वितीय स्नेहल गावडे ८५.५० टक्के तर सेजल नाईक ८४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कॉमर्स विभागात वैष्णवी भा़ंगले ९२.५० टक्के प्रथम, धनेश नाईक ९१ टक्के द्वितीय, आर्या कुरतडकर ९०.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर विज्ञान शाखेत राहुल गावडे ९२.८३ टक्के प्रथम, द्वितीय पार्थ राऊळ ९०.५० तर तृतीय श्रावणी रासम व सलोनी कोटकर ८७.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी शाखेतून निलेश सावंत ६२.३३ टक्के प्रथम, टक्के द्वितीय वासुदेव गावडे ५९, ५८.३३ टक्के गुण मिळवत धनश्री राऊळ हीन तृतीय क्रमांक पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचं शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांच्यासह प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक वर्गाकडुन अभिनंदन करण्यात आले आहे. निकालासाठी मेहनत घेणाऱ्या प्राध्यापकांच शाळा व्यवस्थापन समितीकडून अभिनंदन केले आहे.