
सावंतवाडी : आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा बारावीचा निकाल ८५ टक्के लागला आहे. प्रशालेतून तेजल धोंडू शेळके ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सोनाली संजय नाईक ७२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संजना चंद्रकांत आरोसकर ६७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत, सचिव शांताराम गावडे, सहसचिव सिद्धेश नाईक, सर्व पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.