SSC RESULT 2023 ; दोडामार्ग तालुक्यात निकाल 98.66 टक्के

अथर्व गवस प्रथम
Edited by: संदीप देसाई
Published on: June 02, 2023 21:02 PM
views 190  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.३६ टक्के इतका लागला असून तालुक्यात करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिले क्रमांक पटकाविले आहेत. अथर्व संदीप गवस ९५ टक्के तर प्रणिता पालवे हिने ९४.६० टक्के गुण मिळवित द्वितीय आलीय. तर तिसरी आलेली विद्यार्थिनी दोडामार्ग हायस्कूलची वेदिका नाईक असून तिने ९४.४० टक्के गुण मिळवले आहेत.

दरम्यान दोडामार्ग तालुक्यातील एकूण १५ माध्यमिक शाळांपैकी १२ प्रशालांचा १०० टक्के इतका निकाल लागला आहे. यात घोडगेवाडी येथील कीर्ती विद्यालयाने सलग १२ वर्षे १०० टक्के निकाल लावत १०० नंबरी यशाचा एक तप पूर्ण करत स्वतःचा वेगळा ब्रँड निर्माण केला आहे. तालुक्यातून एकूण३६७ विद्यार्थी परीक्षेस सहभागी झाले होते. पैकी ३६६ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली यात ३६० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल ९८.३६ टक्के इतका लागला. १४७ विद्यार्थी विशेष श्रेणीत तर १५४ जण पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुक्यातून कौतुक होत आहे. दोडामार्ग च्या वेदिकाने गणित विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून कमाल केली आहे.