सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकास निर्बंध

Edited by:
Published on: March 18, 2024 13:05 PM
views 96  views

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. या निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) अन्वये जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यात निर्बंध आदेश जारी केला आहे.

यामध्ये ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही, सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी  ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तीनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. ही निवडणूक प्रक्रीया 6 जून 2024 पर्यंत अंमलात राहतील.