
कणकवली : सिंधुदुर्गातील दशावतार कला सातासमुद्रापार नेण्याचे काम दशावतार कलाकारांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, असे कौतुकोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. हे शिबिर पालकमंत्री नेते राणे यांच्या माध्यमातून पार पडले. याच्या शुभारंभप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, बबलू सावंत, दशावतारी कलाकार नाथा नालंग, पप्पू साटम, मारुती सावंत, गुरुनाथ मेस्त्री, पुरुषोत्तम खेडेकर, सुरेश गुरव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. सचिन डोंगरे, डॉ. देशमुख, वैभव फाले, सी. आर. सावंत, पी. डी. कदम, शीतल सावंत, कविता राऊळ, व्ही. जी. जाधव, कक्षसेवक सुनील यादव, ईसीजी तज्ज्ञ किसन ठोंबरे, श्रीमती दाभोलकर, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विशाल रेड्डी यांनी मार्गदर्शन करतानाच दशावतारी कलाकारांच्या कलेचेही कौतुक केले. आरोग्य विषयक मदत दशावतार कलाकारांना लागेल दिली जाईल, असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले. जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांची मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्रात पहिल्यांदाच करण्यात आली. याबद्दल कलाकारांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.










