
दोडामार्ग : तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तळकट ग्रामपंचायत व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी खास महिला आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. अंधारे मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिराचा एकूण 97 महिलांनी लाभ घेतला . महिला आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी महिला या कुटुंबाचा कणा असल्याचे सांगितले, कुटुंबाचा प्रमुख पुरुष जरी असला तरी महिलाही कुटुंबाचा कणा असते कारण पूर्ण कुटुंबाला सांभाळण्याचं काम तीच करत असते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुटुंबातील सर्व गोष्टींकडे सर्व व्यक्तींकडे मुलांकडे तिलाच लक्ष द्याव लागत. त्यामुळे महिला आरोग्य संपन्न असली तरच ती आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकते त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. या शिबिरात जनरल तपासणी, स्त्री रोग तज्ञ, नेत्र तपासणी, रक्त तपासणी,ऑर्थोपेडीक सर्जन, इत्यादी तपासण्या व मोफत औषधे देण्यात आली .
यावेळी तळकट ग्रामपंचायत कडून प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट व झोळंबे उपकेंद्र यांना पंधरा वित्त मधून औषधे व गोळ्या सुपूर्त करण्यात आल्या, यावेळी व्यासपीठावर तळकट उपसरपंच रमाकांत गवस, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर लब्दे, असती रोग तज्ञ डॉक्टर अवधूत, डॉक्टर राणे, ग्रामसेवक कुबल, ग्रामपंचायत सदस्य पूर्वी सावंत, दिव्या राऊळ, शशिकांत राऊळ, विवेक मळीक, अमोल मळीक, दुर्गाराम गवस, दत्तप्रसाद सावंत, सुनेत्रा नांगरे, आशा सेविका संध्या नांगरे, इत्यादी उपस्थित होते.