
सावंतवाडी : गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सारस्वत समाजातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेमध्ये ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कुडाळ येथील मराठा सभागृह येथे संपन्न झाला.संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी उपाध्यक्ष रघुवीर मंत्री सचिव संतोष पै यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सारस्वत समाज सर्व विद्यार्थ्यांचा नेहमी पाठीशी राहील त्यांना शेक्षणिक मदती बरोबरच पुढील शेक्षणिक वाटचालीसाठी व करियर निवडीसाठी गरज लागेल तेथे मदतीसाठी प्रयत्नशील राहील. विद्यार्थ्यानी पुढील शैक्षणिक जीवनात गुणवत्ता प्राप्त करून स्वत: बरोबरच आई वडील तसेच समाजाचे नाव उंचवावे. आज जगात आपल्या समाजातील कित्येक व्यक्ति उच्च पदावर असून त्यांचा ज्ञानाचा उपयोग जगाला होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे असे मनोगत श्री. नाडकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.रघुवीर मंत्री यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व शैक्षणिक जीवनात चिकाटीचे महत्व किती आहे याची जाणीव करून दिली. कार्येक्रमास इयत्ता १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते तसेच समाजबांधव उपस्थित होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी नरेंद्र देशपांडे, श्रीम. कुंदा पै , सौ.जयंती कुलकर्णी , सौ. श्रुर्ती राजाध्यक्ष उपस्थित होते. आभार सचिव संतोष पै यांनी मानले.