ड्रग्स फ्री सिंधुदुर्ग अभियान राबविण्याचा संकल्प

नशाबंदी मंडळाच्या बैठकीत निर्णय
Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2025 17:25 PM
views 80  views

सावंतवाडी : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत व्यसनमुक्तीवर कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेने ६७ वर्ष पूर्ण करून महाराष्ट्रातील ३६ जिल्हा संघटकाचे संवाद, समन्वय आणि वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवार १३ जून ते १५ जून पर्यंत प्रयास, सेवाकुंर भवन अमरावती याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. 

या ठिकाणी वर्षभरात करावयाच्या कार्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी संघटक बैठकीचे उद्घाटन प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी, नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक चिटणीस अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, सदस्य बॉस्को डिसुझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३६ जिल्ह्यातील संघटक, ७ विभाग प्रमुख, नशाबंदी मंडळाचे कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रत्येक जिल्ह्यात किमान 10 शाळा तंबाखूमुक्त करण्याचा व प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबविण्याचा, गडकिल्ले व्यसनमुक्त संवर्धन करण्याचा तसेच गावागावात व्यसनविरोधी जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला, अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी दिली.