
कुडाळ : पुणे येथील राजश्री शाहू प्रतिष्ठानचा "राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार" पंचायत समिती कुडाळ ग्रामपंचायत बावं येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवक रेश्मा मारूती ठाकुर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
ज्ञानजोती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ पुणे येथे राजश्री शाहू प्रतिष्ठान पुणे तर्फे दरवर्षी ग्रामविकासात विविध विकास कामे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी तसेच आपल्या गावच्या विकासासह, तालुका, जिल्हा, राज्य व देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन केलेल्या कायार्चा गौरव म्हणून राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राजश्री शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या सहयोगाने संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर यांचे पुढाकाराने सन्मानित करण्यात येते.
यावर्षी राष्ट्रीय महिला आयोग महाराष्ट्राच्या अध्यक्ष नामदार रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते रेश्मा ठाकूर यांना राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाकूर यांच्या या सन्माना बद्दल त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.