
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झाले. कुडाळ, देवगड वैभववाडी या तालुक्यांचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले.
सावंतवाडी सभापती पदअनुसूचित जाती महिला साठी, वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी, कणकवली पंचायत समिती सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी, मालवण व दोडामार्ग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सभापती पदे आरक्षित झाली. यामुळे या जिल्ह्यात आठ पंचायत समितीवर चार महिला सभापती पदे भूषविणार आहेत.
शासनाच्या 9 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार अडीच वर्षाच्या कालावधीसाठी व शासनाने ठरवून दिलेल्या सूचनाप्रमाणे जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांनी सांगितले. कुमार स्वरूप कुमठेकर याचा हस्ते चिट्ठी काढून ही पदे आरक्षित झाली. सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांच्या उपस्थितीत सभापती आरक्षण पदाची ही सोडत झाली.
असं आहे पं. स. सभापतीपदाचं आरक्षण !
कणकवली : ना. मा. प्र. (महिला)
देवगड : सर्वसाधारण
वैभववाडी : सर्वसाधारण
कुडाळ : सर्वसाधारण
मालवण : सर्वसाधारण महिला
सावंतवाडी : अनुसूचित जाती महिला
वेंगुर्ला : ना. मा. प्रवर्ग सर्वसाधारण
दोडामार्ग : सर्वसाधारण महिला










