सिंधुदुर्गातील पं. स. सभापतीपदांची आरक्षण सोडत 7 ऑक्टोबरला

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 30, 2025 16:42 PM
views 281  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत मंगळवार  दि. 7 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी यांच्या समक्ष काढण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे कळविले आहे.

ग्रामविकास व जलसंधारण विभगा मंत्रालय मुंबई याच्याकडील अधिसूचना अन्वये जिल्ह्यातील एकूण 8 पंचायत समित्यांसाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होवून लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता पुढीलप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण आरक्षित झालेले आहे.

अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षित ठेवावयाची पद संख्या

अनुसूचित जाती (महिला) १ नागरिकांचा मागास प्रवर्ग १ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १ सर्वसाधारण ३ सर्वसाधारण (महिला) २ असे आरक्षण पंचायत समिती सभापती पदांसाठी काढण्यात येणार आहे.

वरील पदे सोडत काढून वाटप करावयाची आहेत, सोडत मंगळवार दि. 7 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, पहिला मजला येथे जिल्हाधिकारी यांचे समक्ष काढण्यात येणार आहेत, तरी इच्छुकांनी नियोजित वेळी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे