
सावंतवाडी : आंबोली जकात वाडी येथे मानवी वस्तीत भटक्या कुत्र्यांनी हरीणाच्या पिल्लाला जखमी केले होते. हरीणाच्या पिल्लाने जीव वाचवण्यासाठी जकातवाडी येथील तलावात उडी मारली होती. यावेळी प्रवीण राऊत यांनी रॅपिड रेस्क्यू टीमला कॉल केला.
रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य प्रथमेश गावडे, राकेश अमृस्कर, वनपाल गोरख भिंगारदिवे , वनरक्षक अनिकेत देशमुख , संकल्प जाधव, तानाजी चव्हाण, अनिकेत आवारे, बाळा गावडे ही टीम घटनास्थळी दाखल झाली. प्रथमेश गावडे, राकेश अमृस्कर, बाळा गावडे यांनी पाण्यात उतरून हरणाला पकडले. प्रथमोपचारासाठी आंबोली रेंज ऑफिसला येऊन हरणावर प्रथमोपचार करून त्या हरणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.