
वैभववाडी : रिपब्लिकन सेना कोकण प्रदेशचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवार २८ सप्टेंबरला वैभववाडीत आयोजित करण्यात आला आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.
यावेळी रिपब्लिकन सेना कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस मिलिंद जाधव, उपाध्यक्ष अशोक कणगोलकर, प्रकाश कासे, प्रकाश करुळकर, खजिनदार सुरेश मंचेकर , सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते अनिल तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळकृष्ण जाधव, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग) प्रदिप कांबळे, दत्ता पवार, धनाजी जाधव, मोहन जाधव, रमेश बावडेकर, आनंद तांबे, अंकुश सकपाळ, दत्ता पवार, लक्ष्मण चौकेकर, सुरेश अरुळेकर, प्रा. वसंत विणकर अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी केले आहे.










