योग्य वेळी उत्तर देऊ | साळगावकरांचा पलटवार

Edited by: विनायक गांवस
Published on: July 08, 2024 12:46 PM
views 295  views

सावंतवाडी : योग्य वेळी उत्तर देऊ. कोणी कोणाला नगराध्यक्ष केलं ? ते कानात सांगू असा पलटवार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानावर श्री. साळगावकर यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे. तर योग्य वेळी उत्तर देऊ असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.