
सावंतवाडी : सेवा निवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्था सिंधुदुर्गच्या पार पडलेल्या तिसऱ्या वार्षिक सर्व साधारण सभेत संस्थेच्या कार्यकारीणीची नव्याने पुनर्रचना करण्यात आली आहे. संस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय भवन सभागृहात शुक्रवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष अरविंद वळंजू, उपाध्यक्ष आनंद धामापूरकर, महासचिव मोहन जाधव व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी मोहन जाधव यांनी स्वागत करून प्रास्ताविक केल्यानंतर दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त जमा-खर्च, सभासद आढावा व अन्य विषयावर चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर अरविंद वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारीणीची निवड खालील प्रमाणे करण्यात आली. अध्यक्ष सूर्यकांत कदम, उपाध्यक्ष आनंद धामापूरकर (फेरनिवड), कार्याध्यक्ष के. एस. कदम, कोषाध्यक्ष रमेश कदम, सचिव मिलिंद सर्पे, कार्यकारीणी सदस्य - मोहन जाधव, सुहास कदम, वाय. जी. कदम, रूपाली पेंडुरकर, श्रद्धा कदम, मिलिंद जाधव, सिद्धार्थ कदम, मोहन जामसंडेकर, दामोदर गवई i एम. बी. कदम इ. निवड करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष सूर्यकांत कदम, अरविंद वळंजू, विजय वरेकर, के. एस. कदम यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आनंद धामापूरकर यांनी आभार मानले.