
दापोली : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या कडून दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील व्यक्तींमधून उत्कृष्ट कामाची निवड करण्यात येते. त्यांना राज्यस्तरीय "आदर्श पुरस्कार "ने सन्मानीत करण्यात येते. "आदर्श पुरस्कार "* हा एक महत्वाचा पुरस्कार असून शिक्षण, वैद्यकीय, पर्यटन व पर्यावरण तसेच सामाजिक कार्य या विभागातील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
या वर्षी हा पुरस्कार चिपळूण येथील सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. सौ. सविता दाभाडे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानासाठी जाहीर करण्यात आला आहे. डॉ. सौ. सविता दाभाडे या चिपळूण मधील प्रसिद्ध अशा 'ॐ कार दातांचा दवाखाना' च्या संचालिका आहेत.
डॉ. सौ. सविता दाभाडे यांचे कार्य
- कोविड काळामध्ये अविरत सेवा
- 2021 मध्ये चिपळूण शहर आणि परिसरात आलेल्या महाविनाशकारी पुरानंतर पूर्ण महिना मोफत दंत तपासणी आणि अल्प दरात उपचार
- विविध शाळा कॉलेज येथे विद्यार्थ्यांना दातांच्या आरोग्यविषयक माहितीपर प्रेझेंटेशन आणि मोफत दंत तपासणी
- दरवर्षी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी नवरात्र उत्सवात ' बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट' ही स्पर्धा घेतली जाते
त्याचबरोबर सामाजिक बाधिलकी जपत त्या लायन्स क्लब ऑफ चिपळूण गेलेक्सी च्या माध्यमातून समाजकार्यात देखील अग्रेसर आहेत. सध्या त्या लायन्स क्लब ऑफ चिपळूण गेलेक्सी च्या सेक्रेटरी म्हणून काम पहात आहेत.
डॉ. दाभाडे यांचा ॐ कार दातांचा दवाखाना नेहमीच संपूर्ण कोंकणातील एक अत्याधुनिक डेंटल क्लिनिक म्हणून ओळखला जातो. येथे सर्वोत्तम आणि वेदनारहित उपचार केले जातात. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते कोकणवासीयांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.
हा पुरस्कार त्यांना रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या अतिशय प्रतिष्ठित अशा पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.










