रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचं 9 ऑगस्टला उद्घाटन !

Edited by: विनायक गांवस
Published on: August 07, 2024 13:20 PM
views 369  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थित ९ ऑगस्ट दुपारी ३ वाजता होणार आहे. 

यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे माजी आमदार ताथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजन तेली यांनी केले आहे.