
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगतची धोकादायक झाडे हटवा आणि रस्त्यावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारा अशी वारवर मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर व युवा कार्यकर्ते गौतम महाले आक्रमक झाले. 8 दिवसात काम नकेल्यास रास्ता रोको करू असा इशारा यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदना म्हटले की दोडामार्ग शहरातील गटार रस्त्यालगतची जीर्ण झालेली धोकादायक झाडे, तसेच शहरातील चार ही बाजूच्या रस्त्यावर गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारून जा ठिकाणी गती रोधक आवश्यक आहेत त्या ठिकाणी नवीन गतिरोधक घाला अशी मागणी गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष करून दिलेले निवेदन धुळखात टाकल. त्यामुळे आता गप्प बसणार नाही येत्या आठ दिवसात म्हणजे 19 जून पर्यंत शहरातील रस्त्या लागची धोका दायक झाडे व रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारून सहकार्य नकेल्यास रास्ता रोको करण्यात येणार आहे. आणि कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सारवीनिक बांधकाम विभागचं जबाबदार असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.