मिठबावात श्री लोके कुलस्वामी मंदीरात धार्मिक कार्यक्रम !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 09, 2024 13:56 PM
views 313  views

देवगड : अखिल लोके ज्ञाती मंडळ मिठबाव – मुंबई, लोके कुलस्वामी देवस्थान समिती मिठबाव यांच्यावतीने सालाबादप्रमाणे ब्राह्मण भोजन आणि श्री‌ सत्यनारायणाची महापुजा देवगड तालुक्यातील मिठबाव वरचीवाडी श्री देव लोके कुलस्वामी मंदीरात आयोजित करण्यात आली आहे.

त्यानिमित्त रविवार १२ मे रोजी ब्राह्मण भोजन, १४ मे रोजी श्री सत्यनारायण महापुजा होणार आहे. तरी आपण भाऊबंद मंडळी व माहेरवासिणी, नातेवाईक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.